बोईसरमध्ये १२ बांगलादेशींना अटक

बोईसर येथील यशवंतसृष्टी भागात काही नाका कामगारांमध्ये बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

SHARE

बोईसरमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशींना वसई पोलीस आणि एटीएस पालघर यांच्या पथकाने सोमवारी अटक केली. यामध्ये ९ महिलांचा समावेश आहे. हे बांगलादेशी मजूर असून ते सर्वजण अणुऊर्जा प्रकल्पापासून काही अंतरावर राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

इस्माईल अखिल शेख (३५), फिरोज अब्दुला खान (३६), इराण रहिम खान (५०), राबिया नुर इसलाम काजी (३२), राणु मुल्ला तुतामिया शोदत (३५), नुर जहा आक्शु शेख (३०), माबिया इमरान शिकदार (४०), सोनाली इप्तार मुल्ला (२४), शेनाज गाऊज शेख (२५), नजिया टुटूल शेख (३४), शुमी रशेल शेख (३२) आणि शिरीना ईस्टनफिल शेख (२५) अशी अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत.

बोईसर येथील यशवंतसृष्टी भागात काही नाका कामगारांमध्ये बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा मारून  १२ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून १० मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ८ किलोमीटर परिसरात म्हणजे कुरगाव, बोईसर गणेश नगर, पास्थळ या भागात हे बांगलादेशी राहत होते.हेही वाचा -

डोंबिवलीत तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

मोकाट जनावरांच्या मालकांना पालिका आकारणार 'इतका' दंड
संबंधित विषय
ताज्या बातम्या