Advertisement

मोकाट जनावरांच्या मालकांना पालिका आकारणार 'इतका' दंड

मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पालिकेतर्फे धरपकड केली जाते. या जनावरांना कोंडवाड्यात ठेवलं जातं. त्यानंतर जनावराचा मालक दंड भरून जनावर घेऊन जातो.

मोकाट जनावरांच्या मालकांना पालिका आकारणार 'इतका' दंड
SHARES

मुंबईत फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या मालकांवर आता मुंबई महापालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे. मोकाट जनावरांच्या मालकांकडून प्रति जनावर १० हजार रुपये दंड पालिका आकारणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर गाई, बैल, म्हैस मोकाट फिरत असतात. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाय-बैलांना बांधून ठेवले जातात. शेण आणि गोमूत्रामुळे पदपथावर अस्वच्छता होते. याचा त्रास पादचाऱ्यांना होतो. तसंच वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो. याची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे. मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरील दंडात्मक कारवाईचा बडगा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 

मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पालिकेतर्फे धरपकड केली जाते. या जनावरांना कोंडवाड्यात ठेवलं जातं. त्यानंतर जनावराचा मालक दंड भरून जनावर घेऊन जातो. जनावर सोडण्यासाठी पालिका सध्या २५०० रुपये दंड आकारत आहे. दंडाची रक्कम कमी असल्यामुळे ती भरून मालक जनावरांना सोडवून घेऊन जातात. पुन्हा जनावरे रस्त्यावर मोकाट फिरतात. त्यामुळे दंडाची रक्कम वाढविण्यात यावी अशी मागणी मुंबईकरांकडून होत होती. याची दखल घेत पालिका दंडाची रक्कम १० हजार रुपये करणार आहे. हेही वाचा- 

पश्चिम रेल्वेवरील 'या' स्थानकांना मिळणार नवा साज

मुंबईत पूर येणार की नाही, हे आधीच कळणार!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा