Advertisement

कुर्ल्यात गोडाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात

कुर्ला खाडी नंबर-३, सर्वोदय हॉस्पिटल जवळील गोडाऊनला आग लागली.

कुर्ल्यात गोडाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात
SHARES

मुंबईतील कुर्ला परिसरातील एका गोडाऊनला आग लागली आहे.  मंगळवारी सकाळी ८:४५ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

कुर्ला खाडी नंबर-३, सर्वोदय हॉस्पिटल जवळील गोडाऊनला आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, या आगीच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि ९ फायरवाहन, ६ जम्बो वॉटर टँकर, १ वॉटर टँकर, १ रेस्क्यु वाहन, १ रुग्णवाहिका इत्यादी उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

मुंबईतील साकीनाका परिसरातील खाडी नंबर ३ येथील एका प्लास्टिक गोडाऊनला लागलेली भीषण आग २ तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या ९ गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका इथं लागलेली ही आग प्रथम एक प्लास्टिकच्या गोडाऊनला लागली होती. त्यानंतर ही आग आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये पसरली. या आगीमुळं आतापर्यंत ७ ते ८ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवानं या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा