Advertisement

करी रोड आग : महापौर घटनास्थळी, 'यांना' धरलं जबाबदार

करीरोड परिसरातील अविघ्न टॉवर इमारतीची आग वाढत आहे. यासाठी किशोरी पेडणेकर यांनी सोसायटी मॅनेजमेंटला जबाबदार धरलं आहे.

करी रोड आग : महापौर घटनास्थळी, 'यांना' धरलं जबाबदार
SHARES

करीरोड परिसरातील (Currey Road Fire) अविघ्न टॉवर इमारतीला भीषण आग लागली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. सध्या घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर हजर आहेत.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सध्या महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे. मात्र इतकी मोठी इमारत असूनही आगीनंतरची काही यंत्रणा तिथं उपलब्ध होती, असं चित्र दिसलं नाही. मी आता घटनास्थळी आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, आग हळूहळू अनेक मजल्यांवर पसरतेय. १९ ते २५ मजल्यांवरती सध्या आग आहे. परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं आग जोरात पसरतीय. लोकांना बाहेर काढण्यासंबंधी तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकारी काम करत आहेत. 

दरम्यान, स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एक व्यक्ती इमारतीतून बाल्कनीच्या मार्गानं खाली येण्याचा  प्रयत्न करत होता. पण त्यावेळी तोल जाऊन तो खाली पडला. अरुण तिवारी असं त्याचं नाव असून तो ३० वर्षांचा होता. त्याला केईएम रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

अग्निशमन दलाचे लोक शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारीचा हात खाली निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक १९व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरू होतं. यातून आग लागल्याची माहिती आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाले.

आगीसाठी त्यांनी सोसायटी मॅनेजमेंटला जबाबदार धरलं आहे. सोसायटीतले लोक सांगतायत त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किगमध्ये ठेवलं जात नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसतायत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.हेही वाचा

करीरोड परिसरात इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा