Advertisement

करीरोड परिसरात इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

करीरोड परिसरात इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील करी रोड (Currey Road) परिसरात रहिवासी इमारतीला आग (Fire News) लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठ मजली इमारतीमध्ये १९व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे.

यामध्ये एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी बाल्कनीला लटकताना दिसून येत आहे. पण काही वेळानं तो रहिवासी हात सुटल्यानं खाली पडताना व्हिडिओत दिसत आहे. 

अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. १९ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत आहे. 

अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर हजर आहेत. सध्या महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे. मात्र इतकी मोठी इमारत असूनही आगीनंतरची काही यंत्रणा तिथं उपलब्ध होती, असं चित्र दिसलं नाही. मी आता घटनास्थळी आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

आग हळूहळू अनेक मजल्यांवर पसरतेय. १९ ते २५ मजल्यांवरती सध्या आग आहे. परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं आग जोरात पसरतीय. लोकांना बाहेर काढण्यासंबंधी तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकारी काम करत आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.हेही वाचा

'चायनीज' खाताय, मग जरा साभाळून; आरोग्यासाठी ठरू शकतं घातक

मुंबईतील 'या' भागात २६ ऑक्टोबरला पाणी पुरवठा राहणार बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा