Advertisement

बीएमसी कर्मचार्‍यांना वैद्यकीय गटविमा लागू

यामध्ये कर्मचारी व त्याची पत्नी / पती आणि दोन मुले अशा एकूण ४ जणांच्या कुटुंबाला गट विमा पॉलिसी घेता येते.

बीएमसी कर्मचार्‍यांना वैद्यकीय गटविमा लागू
SHARES

मुंबई महापालिकेतील अभियंते, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी, कामगारांसाठी वैद्यकीय गट विम्याची गरज लक्षात घेत बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनने पुढाकार घेऊन दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीच्या माध्यमातून वैद्यकीय गट विमा योजना ३० जुलै २०२० पासून सुरू केली आहे. या योजनेचे हे दुसरे वर्ष यशस्वीपणे अभियंता, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे सुरू झालं आहे.

या योजनेची वैशिष्टये म्हणजे महापालिकेतील कार्यरत ५८ वर्षे वयापर्यंतच्या कर्मचा-यांना ५ लाख रकमेची मूळ पॉलिसी असून त्यावर ५ लाख आणि १० लाख रक्कमेची टॉप अप पाॉलिसी घेता येते. यामध्ये कर्मचारी व त्याची पत्नी / पती आणि दोन मुले अशा एकूण ४ जणांच्या कुटुंबाला गट विमा पॉलिसी घेता येते. तसंच कर्मचारी त्यांची पत्नी – पती आणि दोन मुले आणि आई- वडील किंवा सासू – सासरे अशा एकूण ६ जणांच्या कुटुंबालासुध्दा गट विमा पॉलिसी घेता येते. 

पालिकेतील सेवानिवृत्त अभियंते – कर्मचारी आणि कामगारांसाठी देखील योजना सुरू करण्यात आलेली आहे . त्याचा सेवानिवृत्त कर्मचारी – कामगारांनी लाभ घ्यावा आणि योजनेत सामील व्हावे. असे आवाहन युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी केले आहे.

या वैद्यकीय गट विमा योजनेत कॅशलेस आणि नॉन कॅशलेस उपचारांची व्यवस्था  मुंबई महानगर प्रदेशातील ७०० रूग्णालयात आहे. तसंच भारतभर सुमारे ६ हजार रूग्णालयांत उपचारांची सोय या योजनेमध्ये सामील होणा-या सभासदांना उपलब्ध आहे. या योजनेमध्ये अभियंते आणि सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना सामावून घेण्याची तरतूद आहे. 

तसेच सेवानिवृत्त कर्मचारी – कामगारांना देखील या वैद्यकीय गट विमा योजनेचे सभासद होऊन लाभ घेता येतील. कर्मचा-यांना, सेवानिवृत्तांना या योजनेमध्ये किमान ५ वर्षे सभासद असण्याची अट आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा