
हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबई (mumbai) शहर जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी एक महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे.
कोकण, केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप, मालदीव, कोमोरिन क्षेत्र आणि मन्नारच्या आखातातील समुद्रात ताशी 35 ते 45 किमी ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीवरील काही भागात वाऱ्याचा वेग ताशी 65 किमी पर्यंत पोहोचू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने (IMD) मच्छिमारांना (Fisherman) 26 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत समुद्रात मासेमारीकरिता जाऊ नये असा सल्ला दिला आहे. या काळात समुद्रातील परिस्थिती धोक्याची असण्याची शक्यता आहे.
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशावेळेस समुद्रात मासेमारी अथवा प्रवास करणे धोक्याचे ठरणार आहे.
सतत बदलणाऱ्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मच्छिमारांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा
