विजेत्या गिरणी कामगारांना १७ जानेवारीचा अल्टिमेटम, अन्यथा घर विसरा!

३९५ विजेत्या गिरणी कामगारांनी अद्यापही म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यामुळे आता मुंबई मंडळाने या ३९५ कामगारांना शेवटी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

एमएमआरडीएच्या पनवेल, कोन येथील घरांसाठी विजेत्या ठरलेल्या ३९५ विजेत्या गिरणी कामगारांनी अद्यापही म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे कागदपत्रे जमा केलेली नाहीत. या कामगारांना याआधी कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देऊनही विजेते समोर येत नाहीत. त्यामुळे आता मुंबई मंडळाने या ३९५ कामगारांना शेवटी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.


म्हाडाचा कामगारांना अल्टिमेटम!

१७ जानेवारी २०१८ पर्यंत या कामगारांनी कागदपत्रे सादर केली नाहीत, तर त्यांना घराला मुकावे लागणार आहे. कारण कागदपत्रे सादर न करणाऱ्या गिरणी कामगारांचे घर रद्द करत ते घर प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांना देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे 'कामगारांनो पुढे या, कागदपत्रे सादर करा आणि आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करा', असे आवाहन मंडळाने केले आहे.


मुदतवाढ देऊनही विजेते येईनात!

डिसेंबर २०१६ मध्ये एमएमआरडीएच्या २४१७ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील विजेत्या कामगारांकडून कागदपत्र सादर करून घेत, त्यांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. पात्रता निश्चित झालेल्या अर्थात पात्र कामगाराला घराचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, कोनमधील विजेत्यांना २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आणि त्यानंतर ९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. असे असताना पनवेल, कोनमधील ३९५ विजेत्यांनी कागदपत्रच जमा केलेली नाहीत.


कामगारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध

या ३९५ कामगारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर इतर माध्यमातूनही आवाहन केल्यानंतरही कामगार पुढे येत नसल्याने आता मंडळाने शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगारांनो १७ जानेवारीपर्यंत कागदपत्र सादर करा, अन्यथा तुमचे घर प्रतिक्षायादीवरील विजेत्याला मिळेल. आणि तुम्हाला तुमच्या हक्काच्या घराला मुकावे लागेल.हेही वाचा

दोन दिवसांत अहवाल सादर करा! पत्राचाळ सोसायटीलाही म्हाडाचा दणका


संबंधित विषय
ताज्या बातम्या