Advertisement

यंदा म्हाडाचं घर हुकलं? डोन्ट वरी! पुढच्या वर्षी १ हजार घरांची लॉटरी

शुक्रवारी पार पडलेल्या सोडतीच्या माध्यमातून केवळ ८०३ अर्जदारांच्या घराचं स्वप्न यंदा पूर्ण झालं आहे. ज्यांना घर लागलं ते खूश आहेत, तर ज्यांचं स्वप्न अपूर्ण राहिले ते नाराज आहेत. पण आता तुम्हाला फारकाळ नाराज राहण्याची गरज उरणार नाही, कारण म्हाडा पुढच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये १ हजार घरांसाठी लाॅटरी घेऊन येत आहे.

यंदा म्हाडाचं घर हुकलं? डोन्ट वरी! पुढच्या वर्षी १ हजार घरांची लॉटरी
SHARES

म्हाडाच्या परवडणाऱ्या घराचं स्वप्न बाळगून ६५ हजार अर्जदारांनी अर्ज केले असले, तरी शुक्रवारी पार पडलेल्या सोडतीच्या माध्यमातून केवळ ८०३ अर्जदारांच्या घराचं स्वप्न यंदा पूर्ण झालं आहे. ज्यांना घर लागलं ते खूश आहेत, तर ज्यांचं स्वप्न अपूर्ण राहिले ते नाराज आहेत. पण आता तुम्हाला फारकाळ नाराज राहण्याची गरज उरणार नाही, कारण म्हाडा पुढच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये १ हजार घरांसाठी लाॅटरी घेऊन येत आहे.


सभागृहात घोषणा

वांद्र्याच्या रंगशारदामध्ये शुक्रवारी ८१९ घरांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीसाठी ६५ हजार अर्जदारांनी नशीब अजमावलं. तर प्रत्यक्षात ८०३ अर्जदार विजेते ठरले. ८१९ घरांची लॉटरी असली तरी यातील १६ घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने या घरासाठी लॉटरी निघाली नाही.

यावेळी गृहनिर्माण मंत्री रवींद्र वायकर यांनी पुढच्या वर्षी मे २०१८ मध्ये १ हजार घरांची लॉटरी काढणार असल्याची घोषणा करत मुंबईकराना खुशखबर दिली.



फेसबुक लाइव्हला पसंती

रंगशारदा सभागृहात अर्जदाराची म्हणावी तशी उपस्थिती नव्हती. कारण म्हाडाकडून पहिल्यांदाच होत असलेल्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घरात आणि ऑफिसमध्ये बसून अर्जदारांनी लॉटरीचा निकाल पाहण्याला पसंती दिली.


पुढच्या लाॅटरीत सर्व घरांचा समावेश

मे २०१८ मध्ये निघणाऱ्या लॉटरीत अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च गट अशा सर्व गटासाठी घरे असणार आहेत. तर यात मुंबई उपनगरातील घरांचा समावेश असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा