Advertisement

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींची माहिती आता अॅपवर!


म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींची माहिती आता अॅपवर!
SHARES

दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींपैकी, पुनर्विकास झालेल्या उपकरप्राप्त इमारती तसेच पुनर्विकास सुरू असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची इत्थंभूत माहिती लवकरच अॅपवर उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या आयटी सेलकडून यासाठी खास अॅप तयार करण्याचे काम सुरू असून या अॅपद्वारे इमारतीसह मंडळाच्या कामाची कोणतीही माहिती घरबसल्या उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासांतर्गत म्हाडाला काही घरे बिल्डरांकडून मिळतात. मात्र, बरेचसे बिल्डर ही घरे देण्यास वर्षानुवर्षे टाळटाळ करत आहेत. त्यामुळे अशा बिल्डरवर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच बिल्डरांकडून मिळालेल्या घरांची माहिती संकलित करण्यासाठी मंडळाने डिजिटल सर्वे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातूनच नंतर अॅपची संकल्पना पुढे आली.


हेही वाचा

गोरेगावातल्या 'त्या' जमिनीवर म्हाडा बांधणार ३००० घरं

वर्षभरात म्हाडा उभारणार 14,440 घरं


आधी बिल्डरांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाची अर्थात घरांची माहिती डिजिटल सर्वेद्वारे अॅपवर दिली जाणार आहे. त्यानंतर अतिधोदायक इमारतींची माहिती, अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना स्थलांतंरीत करण्यासंबंधीची माहिती, पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतींची माहिती अशी सर्व माहिती डिजिटल सर्वेद्वारे अॅपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या इमारतींसंदर्भातील कुठलीही माहिती अगदी काही मिनिटांतच सहजरित्या उपलब्ध होईल, अशी माहिती दुरूस्ती मंडळ, म्हाडासह सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे रहिवाशांना, सर्वसामान्यांना म्हाडात फेरे न मारता घरबसल्या हवी ती माहिती उपलब्ध होणार असल्याने मंडळाचे हे अॅप महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा