Advertisement

दत्ता ईस्वलकर यांचं निधन, गिरणी कामगारांच्या हक्काचा आवाज हरपला

गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं ७ एप्रिल रोजी सायंकाळी निधन झालंय.

दत्ता ईस्वलकर यांचं निधन, गिरणी कामगारांच्या हक्काचा आवाज हरपला
SHARES

गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं ७ एप्रिल रोजी सायंकाळी निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराशी संघर्ष करत असताना मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८ एप्रिल रोजी सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते म्हणून दत्ता इस्वलकर महाराष्ट्राला परिचित होते. मंगळवारपासून  त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

म्हाडानं गिरणी कामगारांसाठी २०१६ मध्ये पनवेलला सोडत (लॉटरी) काढली होती. या सोडतीत घरं मिळालेल्या अनेक कामगारांचे बँकांचे हप्ते सुरू झाले. मात्र तरीही म्हाडानं घरांचा ताबा अद्याप दिलेला नाही. मार्च २०२० मध्ये म्हाडानं बॉम्बे डाईन मिल आणि श्रीनिवास मिल या घरांची सोडत काढली होती. त्या लोकांनाही अद्याप म्हाडानं कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. याविरोधातच कामगारांच्या मागण्या घेऊन ८ एप्रिलला दत्तांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार होता.

गिरणी कामगारांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी काँग्रेस सरकारनं मार्च २००१ मध्ये जीआर काढला. यानुसार मिलच्या जागेवर जो रोजगार उभा राहिल तिथं कामगारांच्या एका मुलाला नोकरी देण्याचा निर्णय झाला.

मात्र, अद्याप त्यावर अंमलबजावणी होत नव्हती. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दत्ता ईस्वलकरांनी एका मोर्चाचं आयोजन केलं होतं. यासाठी ईस्वलकरांच्या मार्गदर्शनाखाली भायखळ्यात गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्थेचं काम सुरू आहे. याच संस्थेच्या माध्यमातून हा लढा उभा करण्यात आला होता.

दत्ता ईस्वलकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी काम केलं. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि लढ्यामुळे मार्च २०१२ मध्ये गिरणी कामगारांच्या घरांची पहिली सोडत (लॉटरी) काढण्यात आली.

१ लाख ७५ हजार गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. यापैकी १५-२० हजार कामगारांना त्यांनी आत्तापर्यंत त्यांची हक्काची घरं मिळवून दिली. उर्वरित कामगारांच्या घरांसाठी देखील ते संघर्ष करत होते.Read this story in English
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा