महापालिकेच्या महासंग्रामात MIM ही उतरणार

  Pali Hill
  महापालिकेच्या महासंग्रामात MIM ही उतरणार
  मुंबई  -  

  मुंबई - विधानसभा नंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रमात एमआयएमही सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. २२७ पैकी २० पेक्षा अधिक जागांवर एमआयएमचे उमेदवार हमखास निवडून येतील, अशी व्हुरचना केली आहे. मात्र किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालेलं नसल्याची माहिती, एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिली.

  विधानसभा निवडणुकीत मुंबईत खाते उघडून बऱ्यापैकी मते घेणाऱ्या एमआयएमनं महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील भायखळा आणि औरंगाबाद येथून एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. औरंगाबाद आणि कल्याण- डेांबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी यशस्वी घौडदौड सुरू ठेवली. औरंगाबादमध्ये एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आले. तर कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकीत एमआयएमने सात उमेदवारांपैकी दोन नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. पक्षाला मिळणाऱ्या यशामुळं एमआयएमचे मुंबई महापालिकेतही आव्हान असणार आहे. मुस्लिम मतदारांचा फायदा या पक्षाला होणार असल्यानं काँग्रेस, समाजवादी पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत एमआयएमचा एक आमदार निवडून आल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमनं मुंबई शहरात मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे, असेही पठाण यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.