Advertisement

राज्यभरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ

मुंबईतील तापमान गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या सहन करण्यासारखे असले तरी मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा मात्र वाढत चालला आहे.

राज्यभरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ
SHARES

मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना थंडीच्या (Winter) दिवसात उकाडा सहन करावा लागतो आहे. काही दिवसांपासून मुंबईत उकाडा वाढला असून, राज्यभरातील कमाल (Maximum) आणि किमान (Minimum) तापमानामध्ये (Temperature) देखील वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील तापमान गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या सहन करण्यासारखे असले तरी मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) तापमानाचा पारा मात्र वाढत चालला आहे.

राज्यात रविवारी अहमदनगर (Ahmadnager) इथं सर्वाधिक म्हणजे ३६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तसंच, मुंबईत रविवारी सांताक्रूझ (Santacruz) इथं ३३.६ तर कुलाबा इथं ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमान (Maximum Temperature) होतं. तर किमान तापमान २० अंशांखाली असल्यानं सकाळच्या वेळेत उकाडा जाणवायला सुरुवात झालेली नाही. सांताक्रूझ व कुलाबा इथं रविवारी अनुक्रमे १९.१ व २०.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं.

कोकण विभागात (Kokan Division) किमान तापमान सरासरीच्या आसपास होतं. मात्र, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीहून ४ अंशांहून अधिक नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं किमान तापमानाचा पारा सरासरीहून ५.७ अंशांनी अधिक होता. बीडचं तापमान २१ अंशांपर्यंत पोहोचलं. विदर्भाच्या किमान तापमानातही हळूहळू वाढ होत आहेत.

विदर्भातील किमान तापमान १८ ते १९ अंशांदरम्यान नोंदवलं गेलं. हे तापमान सरासरीहून २ ते ३ अंशांनी अधिक आहे. केवळ गोंदिया इथं किमान तापमानाचा पारा कमी आहे. रविवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं १३.२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या २ दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये फार बदल अपेक्षित नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं.

मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा रविवारी कोकणापेक्षा अधिक चढलेला होता. पुणे येथे ३४.४, जळगाव येथे ३४.६, सांगली येथे ३५.२, सोलापूर येथे ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकणात रत्नागिरीचा पारा ३५.९ अंशांवर पोहोचला आहे. रत्नागिरीचे तापमान सरासरीपेक्षा ५.१ अंशांनी अधिक होते. तर विदर्भाचा पारा पण ३३ ते ३६ अंशांदरम्यान होता.हेही वाचा -


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा