Advertisement

पावसाळ्यासाठी एमएमआरसी सज्ज

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचं काम ३३.५ किमीच्या परिसरात सुरू आहे. या कामामुळे पावसाळ्यात वाहतूककोंडी होऊन नये वा पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी एमएमआरसीनं विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाची सेवा २४ तास सुरू असणार आहे.

पावसाळ्यासाठी एमएमआरसी सज्ज
SHARES

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून मुंबई महापालिका कामाला लागली आहे. नालेसफाईच्या कामावर दस्तुरखुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर लक्ष ठेवून आहेत. तर दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)नंही मेट्रोच्या कंत्राटदारांना पावसाळ्याच्यादृष्टीने आवश्यक ती काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच जोडीने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) देखील पावसाळ्यासाठी सज्ज झालं आहे.


काय उपाययोजना?

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचं काम ३३.५ किमीच्या परिसरात सुरू आहे. या कामामुळे पावसाळ्यात वाहतूककोंडी होऊन नये वा पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी एमएमआरसीनं विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाची सेवा २४ तास सुरू असणार आहे.



नियंत्रण कक्षाची स्थापना

१ जूनपासून हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार असून नियंत्रण कक्षातील हेल्पलाईन क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येतील. त्यानुसार एमएमआरसीच्या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत मुंबईकरांना मेट्रो-३ संदर्भातील तक्रारी नोंदवता येतील.

महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कंत्राटदारांना एमएमआरसीकडून आवश्यक त्या सूचना देत पावसाळ्यापूर्वीची कामं मार्गी लावण्यास सांगितल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकिय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.


'या' कामांचा समावेश

पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई, पर्जन्य जलवाहिन्या वळवण्याची काम, पुरप्रवण भागात सिडीमेन्टेशन टाक्या बांधणं, पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करणं इत्यादी कामं एमएमआरसीकडून सुरू असून या कामांना वेग देण्यात आल्याचंही भिडे यांनी स्पष्ट केलं.

या कामांच्या धर्तीवर यंदा मेट्रो-३ मुळे मुंबईकरांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नसल्याचा दावा एमएमआरसीकडून केला जात आहे. तर काही अडचण आलीच तर त्याच तात्काळ निराकरण केलं जाणार असल्याचं एमएमआरसीकडून स्पष्ट केलं जात आहे.



हेही वाचा-

मुंबईची तुंबई झाल्यास मेट्रो जबाबदार!

पावसाळ्यात समुद्राच्या भरतीनुसार लोकल सेवा बदलणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा