Advertisement

MMRCL Recruitment 2023 : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी, 'इथे' करा अर्ज

या भरतीद्वारे, MMRCL संस्थेतील 22 पदे भरणार आहे.

MMRCL Recruitment 2023 : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी, 'इथे' करा अर्ज
SHARES

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)ने नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. MMRCL ने व्यवस्थापकीय आणि इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवार MMRCL च्या अधिकृत साइट https://mmrcl.com/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे, MMRCL संस्थेतील 22 पदे भरणार आहे.

नोंदणी प्रक्रिया 21 जून रोजी सुरू झाली होती आणि ती 1 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

MMRCL मध्ये कुठल्या जागा?

 • महाव्यवस्थापक: १ पद
 • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक: 2 पदे
 • उपमहाव्यवस्थापक: 2 पदे
 • सहाय्यक महाव्यवस्थापक: 5 पदे
 • उपअभियंता: 1 पद
 • पर्यावरण शास्त्रज्ञ: 1 पद
 • पर्यवेक्षक (ऑपरेशन सेफ्टी): 1 पद
 • पर्यवेक्षक (मटेरियल मॅनेजमेंट) : 1 पदे
 • कनिष्ठ अभियंता -II (ट्रॅक): 4 पदे
 • प्रकल्प सहाय्यक (वित्त): 2 पदे

MMRCL भरतीसाठी पात्रता निकष

उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात

निवड प्रक्रिया

जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एमएमआरसीएलची अधिकृत साइट पाहू शकतात.

MMRCL भर्ती 2023 साठी कसा अर्ज करायचा?

 • MMRCL च्या अधिकृत वेबसाईटला https://mmrcl.com/ वर भेट द्या
 • होमपेजवर, "करिअर" वर क्लिक करा आणि "रिक्रूटमेंट" टॅबखाली जा
 • एक नवीन पृष्ठ उघडेल
 • तुम्हाला हवे त्या पदासाठी अर्ज करा.
 • अर्ज भरा.
 • प्रिंटआउट घ्या.हेही वाचा

राणीच्या बागेत लवकरच भूमिगत मत्स्यालय सुरू होणार

सूर्या प्रादेशिक प्रकल्प : मिरा-भाईंदरकरांची तहान मार्च २०२४ पासून भागणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा