Advertisement

वांद्रे कुर्ला पूल अपघाताप्रकरणी कंत्राटदार, सल्लागाराला दंड

सप्टेंबरमध्ये वांद्रे-कुर्ला संकुल इथं उन्नत रस्त्याचे काम सुरू असताना पुलाचा भाग कोसळला होता.

वांद्रे कुर्ला पूल अपघाताप्रकरणी कंत्राटदार, सल्लागाराला दंड
SHARES

सप्टेंबरमध्ये वांद्रे-कुर्ला संकुल इथं उन्नत रस्त्याचे काम सुरू असताना पुलाचा भाग कोसळला होता. याप्रकरणी दुर्घटना प्रकरणाच्या चौकशी अहवालातील शिफारसीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कंत्राटदाराला एक कोटी रुपये, तर सल्लागाराला २० लाख रुपये दंड ठोठावला आहे.

एमएमआरडीएमार्फत सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत कुर्ला ते बीकेसी असा उन्नत रस्ता-पूल बांधण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये या पुलाचे काम सुरू असताना पहाटे साडेचारच्या सुमारास पुलाचा काही भाग कोसळला.

यात १४ जण जखमी झाले. पुलाचा ६५ मेट्रिक टनाचा आणि ८.५ मीटर रुंदीचा स्पॅन (भाग) कोसळला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी एमएमआरडीएनं त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती.

समितीत एमएमआरडीए, व्हीजेटीआय आणि आयआयटीमधील प्रत्येकी एका तज्ज्ञ व्यक्तीचा समावेश होता. या समितीनं ऑक्टोबरमध्ये चौकशी अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र हा अहवाल सादर करण्यास विलंब झाला. हा अहवाल सादर झाल्यानंतर त्यातील शिफारसीनुसार एमएमआरडीएने कारवाई करण्यास सुरुवात केली.

चौकशी अहवालात कंत्राटदार कंपनी आणि सल्लागाराकडून हलगर्जी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कंत्राटदाराला एक कोटी रुपये तर सल्लागाराला २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तर दंडात्मक कारवाईबरोबरच कंत्राटदार कंपनीतील प्रमुख कर्मचाऱ्यास तसंच सल्लागार कंपनीतील प्रमुख कर्मचाऱ्यास प्रकल्पातून हटवण्याचेही निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा दंड आता या कंपन्यांना भरावा लागणार आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' वॉर्ड्समध्ये सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंद

शुक्रवार- शनिवारी 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा