देशातील सर्वात मोठ्या अटलबिहारी वाजपेयी पुलावरून म्हणजेच शिवडी (sewri) – न्हावाशेवा सागरी सेतूवरून अतिशय जलद प्रवास करणाऱ्या प्रवासी तसेच वाहनचालकांना आता खाण्याच्या गोष्टींसह इंधनाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
अटल सेतूच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जासई येथे फूड प्लाझा (food plaza) आणि पेट्रोल पंपची (petrol pump) सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.
मुंबई (mumbai) ते नवी मुंबई (navi mumbai) अंतर केवळ 12 मिनिटात पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने 21.80 किमी लांबीचा सागरी सेतू बांधला. हा सेतू जानेवारी 2024 पासून वाहतूक सेवेत दाखल झाला.
या सेतूवरून दिवसाला सरासरी 22 हजार 500 वाहने धावतात. या सागरी सेतूमुळे प्रवास अतिशय जलद झाला आहे. मात्र सागरी सेतूवरुन प्रवास करताना वाहनचालक-प्रवाशांसाठी खानपानाची वा इंधनाची सुविधा उपलब्ध नाही.
ही बाब लक्षात घेता आता एमएमआरडीएने (
mmrda) अटल सेतूवर फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप विकसित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. अटल सेतूच्या नवी मुंबईच्या दिशेच्या असलेल्या जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप बांधण्यात येणार आहे.
या दोन्ही सुविधा खासगी कंपनीच्या माध्यमातून विकसित केल्या जाणार आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2024 पासून यासाठीच्या प्रक्रिया सुरू आहे. यासाठी एका खासगी कंपनीबरोबर चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अटल सेतूच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकांवर जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप असणार आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास वाहनचालक तसेच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
हेही वाचा