मुंबईतील मेट्रो नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी Mumbai Metropolitan Region Development Authority ने 8 एप्रिल 2026 पासून प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर असे नवे वेळापत्रक लागू केले आहे. यामुळे प्रवास अधिक सोपा, जलद आणि नियोजनबद्ध होणार आहे.
या बदलांसोबतच मेट्रो लाईन 9 (दहिसर पूर्व–काशिगाव) आणि मेट्रो लाईन 2B (मांडळे–डायमंड गार्डन, पहिला टप्पा) सुरू करण्यात आल्या आहेत. मेट्रो लाईन 9 ही ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा ठरली आहे, तर लाईन 2B मुळे हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.
या विस्तारानंतर मुंबई 100 किमीपेक्षा जास्त मेट्रो मार्ग असलेले दिल्ली नंतरचे दुसरे शहर बनले आहे.
मेट्रो लाईन 2A आणि लाईन 7 आता स्वतंत्र मार्ग म्हणून चालतील
लाईन 7 आणि लाईन 9 एकत्रित चालणार, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव थेट कनेक्टिव्हिटी मिळेल
सर्व मार्गांवर गाड्यांची वारंवारता (frequency) वाढवण्यात आली आहे
प्रवाशांच्या सोयीप्रमाणे वेळापत्रक सोपे करण्यात आले आहे
दहिसर स्टेशनवर लाईन 2A आणि 7 दरम्यान सहज इंटरचेंजची सुविधा
पहिली गाडी: सकाळी 5:50
शेवटची गाडी: रात्री 10:35 ते 11:00
पीक अवर: दर 6 मिनिटांनी
नॉन-पीक: 8 ते 10 मिनिटांनी
एकूण लांबी: 19.79 किमी
पहिली गाडी: 5:50 सकाळी
शेवटची गाडी: 11:00 रात्री
पीक अवर: सुमारे 6 मिनिटांनी
नॉन-पीक: 8 ते 10 मिनिटांनी
यामुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव थेट प्रवास शक्य होणार आहे.
लांबी: 5.38 किमी
पहिली गाडी: 6:00 सकाळी
शेवटची गाडी: 10:15 ते 10:30 रात्री
वारंवारता: सुमारे 9.5 मिनिटांनी
या लाईनमुळे चेंबूर आणि आसपासच्या भागांना मोठा फायदा होणार आहे.
MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, या बदलांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल, तसेच गर्दी कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा
