Advertisement

वडाळा मोनोरेल स्टेशनचं नामांतर होणार का?


वडाळा मोनोरेल स्टेशनचं नामांतर होणार का?
SHARES

वडाळा - 400 वर्षे जुने असलेल्या प्रतिपंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ मोनोरेलचे स्थानक झाले आहे. त्या स्थानकाला दादर पूर्व असे नाव देण्यात आले आहे. याला मनसेने विरोध केलाय. सदरील नावात बदल करून येथील प्रसिद्ध वास्तूचे नाव या मोनोरेल स्थानकाला देण्यात यावे यासाठी मनसे शिष्टमंडळाच्या वतीने एमएमआरडीए आयुक्तांची बुधवारी भेट घेण्यात आली.

मोनोरेल स्थानक हे वडाळा विभागात आहे आणि त्याचा पिनकोडही मुंबई 31 असा आहे. मुळात नामकरणाचा प्रश्न उद्भवतो तेव्हा त्या ठिकाणच्या प्रसिद्ध वास्तू, सामाजिक दृष्ट्या प्रसिद्ध स्थळ किंवा व्यक्तींच्या नावाचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. पण एमएमआरडीएचे अधिकारी कुठल्याही प्रकारचा सखोल अभ्यास न करता मनमानी कारभार करत आहे. यास मनसेचा तीव्र विरोध राहील आणि यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेऊन खेद प्रकट केला. या वेळी रस्ते आस्थापना सरचिटणीस मिलिंद पांचाळ, विभाग अध्यक्ष आनंद प्रभू, मनसे उपाध्यक्ष हेमंत पाटील, उपशाखा अध्यक्ष निलेश तोंडवळकर, शाखा अध्यक्ष राजेंद्र कांबळे, शाखा अध्यक्षा विनया देवधरकर उपस्थित होते. एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याशी चर्चा केली असता सदरील नामांतरासंदर्भात अनेक निवेदने आलेली आहेत. लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा