Advertisement

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा मनसे दाखवणार मोफत शो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा मनसे दाखवणार मोफत शो
SHARES

सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. असं असतानाच आता या चित्रपटाचे अनेक ठिकाणी 'मोफत शो' आयोजित केले जात आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कश्मीर फाइल्स या हॅशटॅगसहीत संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केला आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. २४ मार्च २०२२ मध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता माहीममधील एल. जे. रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहामध्ये हा शो दाखवला जाणार आहे,” असं या फोटोमध्ये म्हटलं आहे.

मनसेतर्फे दाखवण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या शोची मोफत तिकीटं दादरमधील हेदक्करवाडीतील मनसेच्या शाखेमध्ये उपलब्ध असतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. तसंच या तिकीटांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही संदीप देशपांडेंनी ट्विटमध्ये म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा