Advertisement

गणेश मूर्ती विसर्जनातून जमलेले एक लाख रुपये महापौर निधीला


गणेश मूर्ती विसर्जनातून जमलेले एक लाख रुपये महापौर निधीला
SHARES

महापालिकेच्यावतीने कुत्रिम तलावाच्या ठिकाणी गणेशभक्तांसाठी दानपेटी ठेऊन शिवसेना नगरसेविका माधुरी योगेश भोईर यांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी टाकलेल्या पैशातून दानपेटीत 1 लाख रुपयांचा निधी जमा झाला. हा सर्व निधी माधुरी भोईर यांनी आर/ दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष कमलेश यादव आणि विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांच्यासमवेत महापौर निधीसाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे सुपूर्त केला. अशाप्रकारे निधी जमा करून महापौर निधीला देण्याचा नगरसेविका म्हणून केलेला हा पहिलाच प्रयत्न आहे.

कांदिवली (पूर्व), ठाकूर व्हिलेज, येथे श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलाव स्थानिक नगरसेविका माधुरी योगेश भोईर (प्रभाग २५) यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्यावतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, ही मोफत सेवा देताना त्याठिकाणी दानपेटी ठेऊन भाविकांच्या इच्छेनुसार गरजूंना तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दानपेटी ठेवण्याची संकल्पना माजी नगरसेवक योगेश भोईर यांनी मांडली. त्यानुसार तिथे दानपेटी ठेवून लोकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार गणेशभक्तांच्या स्वेच्छा देणगीतून 49 हजार रुपये जमा झाले.


आम्ही 51 हजार रुपये देणगी जमा करून 1 लाख रुपयांचा धनादेश महापौर निधीसाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असल्याची माहिती माधुरी योगेश भोईर यांनी दिली.

यावेळी विभागप्रमुख विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक रश्मी भोसले, शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, मिलिंद भोईर आणि शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. महापौर निधीतून गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते.


हेही वाचा - 

महापौर निवासस्थानातील कृत्रिम तलाव बंद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा