रेल्वे प्रवासादरम्यान रुळ ओलांडू (Railway Track) नये, पादचारी पुलाचा (FOB) वापर करावा, लोकलच्या (Local) दरवाजात उभे राहू नये यांसह अनेक घोषणा रेल्वे प्रशासनाकडून (Railway) करण्यात येतात. मात्र, तरीही प्रवासी (Passengers) या घोषणांकडं दुर्लक्ष करून रेल्वे रुळ ओलांडतात. परिणामी अपघात (Accidents) होऊन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. याबाबत गतवर्षातील आकडेवारी (Statistics) समोर आली असून, रेल्वे रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात २ हजारांहून अधिक प्रवाशांनी जीव गमावल्याचे माहिती अधिकारात समोर आलं आहे.
रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात २ हजार १२३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, याच काळात १ हजार ७५८ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून (RPF) माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख (Information Rights Activist Shakeel Shaikh) यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार (Information), मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणं, गाडीतून पडणं यामुळं एकूण १ हजार ३८४ प्रवाशांची मृत्यू आणि १ हजार ४७ प्रवासी जखमी झाले. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर याच कारणांमुळं एकूण ७३९ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७११ प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबई
उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर रेल्वे
रुळ ओलांडताना किंवा ट्रॅक
ओलांडताना २०१३ पासून ते २०१८
पर्यंत एकूण १९ हजार २४३०
प्रवाशांनी जीव गमावला आहे.
तसंच,
याच
वर्षात २० हजार १६८ प्रवासी
जखमी झाले आहेत.
दरम्यान,
माहिती
अधिकारातून मिळालेल्या माहितीत
तफावत (Information
variations)
असल्याचं
समोर आलं आहे.
एका
आरटीआय कार्यकर्त्याला रेल्वे
रूळ ओलांडताना तसेच लोकलमधून
पडून २ हजार १२३ प्रवाशांचा
जीव गमवल्याची माहिती देण्यात
आली.
तर
दुसऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला
याच कारणास्तव २ हजार ६६४
प्रवाशांनी जीव गमाविल्याची
माहिती देण्यात आली आहे.
माहिती
अधिकार कार्यकर्ते शकील शेख
यांच्या माहितीनुसार,
रेल्वे
प्रवासात २ हजार १२३ प्रवाशांनी
गमावला जीव गमावला आहे.
मात्र
या माहितीतही तफावत आहे.
कारण
याच कालावधीत म्हणजे जानेवारी
२०१९ ते डिसेंबर २०१९ या
कालावधीत माहिती अधिकार
कार्यकर्ते समीर झवेरी
(Information
rights activist Sameer Zaveri)
यांना
माहिती अधिकार कायद्यांतर्गत
(Under
the Right to Information Act)
माहिती
मागविली असता यामध्ये रेल्वे
रूळ (Railway
Track)
ओलांडून
आणि लोकलमधून पडून २ हजार ६६४
प्रवाशांनी आपला जीव गमाविल्याचं
समजतं.
३ हजार १५८ प्रवासी जखमी झाले. मध्य रेल्वे मार्गावर एकूण १ हजार ३९३ प्रवाशांचा मृत्यू आणि १ हजार ८३६ प्रवासी जखमी झाले. पश्चिम रेल्वे मार्गावर मार्गावर एकूण ९२८ प्रवाशांचा मृत्यू आणि १ हजार ३२२ प्रवासी जखमी झाले आहेत.
हेही वाचा -
अल्पवयीन मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
न्यूझीलंडच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती, प्रतिस्पर्धी फलंदाजाला खाद्यावर उचलले