Advertisement

Coronavirus Updates: राज्यभरात सर्वाधिक रुग्ण मुंबईतच

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा मुंबईसह राज्यातही वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

Coronavirus Updates: राज्यभरात सर्वाधिक रुग्ण मुंबईतच
SHARES

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा मुंबईसह राज्यातही वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. भारतातील विविध राज्यांपैकी मुंबईला कोरोनानं घेरलं आहे. राज्यातील एकूण करोना रुग्णांच्या संख्येपेक्षा निम्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्याशिवाय, राज्यातील करोना रुग्णांच्या मृत्यूंच्या तुलनेत मुंबईतील करोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक असल्याचंही आढळून आलं आहे.

राज्यात आतापर्यंत ६६१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईत ३७७ रुग्ण आहेत. महापालिकेनं मुंबईत तब्बल १० हजार लोकांच्या चाचण्या केल्यानंतर ३७७ लोकांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तर राज्यात आतापर्यंत करोनामुळं ३२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २२ जण हे एकट्या मुंबई आणि आसपासच्या महापालिका क्षेत्रातील असल्याची माहिती उघड झाली आहे. 

राज्यात १४५ नवे करोना रुग्ण आढळले. त्यापैकी ५२ नवे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईच्या आसपास असलेल्या महापालिका क्षेत्रातील रुग्णही मुंबईतच उपचारासाठी येत असल्यानं करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं आढळून येत आहे. मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबईत २४२ कंटोन्मेंट झोन तयार करण्यात आले असून हे परिसर सील करण्यात आले आहेत.

२४२ परिसर सील करण्यात आले असून या परिसरातील नागरिकांना बाहेर पडण्यास आणि आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना प्रशासनाच्यावतीनं जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. तसंच या परिसरात दिवसाआड औषधांची फवारणी करण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा