Advertisement

दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त विषारी

सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती.

दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त विषारी
SHARES

सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती. समुद्रावरून वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळे वाढलेलं प्रदूषण या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. सोमवारी दक्षिण मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही अधिक पाहायला मिळाला.

सोमवारी कुलाबा परिसरातील हवा दिल्लीच्या संपूर्ण हवेच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. दिल्लीतील संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३३१ नोंदवण्यात आला होता. तर मुंबईतील कुलाबा परिसरातील एक्यूआय ३४५ नोंदवण्यात आला आहे. जो दिल्लीच्या पटीत काही जास्त आहे. तेव्हा मुंबईची दिल्ली होऊ नये याची जबाबदारी मुंबईकरांना घ्यायची आहे.

मंगळवारी सकाळी देखील सोमवारसारखीच पाहायला मिळाली. ज्यात कुलाबा, मलबार परिसरावर धुक्यांची चादर पसरलेली बघायला मिळाली. मुंबईतील कुलाबा, माझगाव, बीकेसी, मालाड आणि अंधेरी परिसरातील हवेची स्थिती खालावली होती. सोबतच पुढील २-३ दिवस ही स्थिती जैसे थे राहण्याची शक्यता आहे.

हिवाळयात प्रामुख्यानं वाऱ्यांची दिशा जमीनीकडून समुद्राकडे असल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे. सोबतच वाहनांमुळे होणारं प्रदूषण, बांधकामात झालेली वाढ यामुळे धुलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. त्यामुळे वातावरणातील हवा प्रदूषित होते.

मंगळवारी देखील मुंबईतील अनेक भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या पार आहे. मुंबईतील एकूण एक्यूआय हा आज २८०पर्यंत पोहोचला आहे. तर कुलाब्यातील एक्यूआय ३७० पर्यंत गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हेवी व्यायाम करणं टाळावं, सोबतच सकाळी आणि संध्याकाळनंतर घराबाहेर पडणं देखील टाळायला हवं.



हेही वाचा

ऐरोलीतील फ्लेमिंगो राईड्सला मिळतोय चांगला प्रतिसाद

कोरोना काळात ८० लाख प्लॅस्टिक कचरा निर्माण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा