Advertisement

मुंबादेवी मंदिराचे नूतनीकरण लवकरच सुरू होणार

हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून सुमारे 100 वर्षे जुन्या मुंबादेवी मंदिराची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार हा नूतनीकरणाचा मुख्य घटक आहे.

मुंबादेवी मंदिराचे नूतनीकरण लवकरच सुरू होणार
SHARES

मुंबईतील मुंबादेवी मंदिर (mumbadevi temple) परिसराचे नूतनीकरण लवकरच सुरू होणार आहे. वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) लवकरच या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पाला पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.

तपशीलाबाबत राज्य सरकारने मुंबई महापालिकेसोबत (bmc) अनेक बैठका घेतल्या आहेत. स्ट्रक्टवेल यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. महापालिकेने ट्रॅफिक सिम्युलेशनचा अभ्यास आधीच पूर्ण केला आहे. विकास आराखड्यात स्थानिक स्थलाकृतिचाही विचार केला जाईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) वाराणसीच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रमाणेच मंदिराच्या सभोवतालच्या 9,000 चौरस मीटर क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी 146 कोटी रुपयांची विकास प्रकल्पाची योजना आखली आहे. याच परिसरात मुंबादेवी मंदिर आहे.

हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. सुमारे 100 वर्षे जुन्या मुंबादेवी मंदिराची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार हा नूतनीकरणाचा मुख्य घटक आहे. भाविकांसाठी मंदीर अधिक सुलभ बनवण्याचे ध्येय आहे.

मुंबादेवी मंदिर हे जुन्या शहराच्या मध्यभागी असलेले एक छोटेसे देवस्थान आहे. कालांतराने, व्यावसायिक आणि उंच इमारतींची या परिसरात वाढ झाली. त्यामुळे विशेषत: नवरात्रीसारख्या सणांमध्ये येथे गर्दी होत आहे. अनेक वेळा, भक्तांना अरुंद, गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये रांगेत उभं राहून देवीच्या दर्शनाची वाट पाहावी लागते.

नूतनीकरणामुळे एकाच वेळी 7,000 लोक राहू शकतील. नवीन बेंच, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्रे आणि पार्किंगची व्यवस्थाही असेल. काळबादेवीच्या बाजूने मंदिर प्रवेशद्वार तीस फुटांनी वाढवण्यात येणार आहे.

याशिवाय मंडल वाटिका असलेली बाग, तलाव आणि हवन सारख्या धार्मिक विधींसाठी जागाही बांधण्यात येणार आहे. यात बेसाल्ट खडकांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला जाईल. पायधुनी तलावाचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे. तेथे भाविकांना पाय धुता येतील.



हेही वाचा

Metro Connect 3 ॲपचे अनावरण, मात्र प्रवासी नाखूश

चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा