Advertisement

मुंबईत रविवारी विंटेज आणि क्लासिक कार रॅलीचे आयोजन

रॅलीमध्ये डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अनेक रंगीबेरंगी जुन्या गाड्या आणि बाईक पाहायला मिळतील.

मुंबईत रविवारी विंटेज आणि क्लासिक कार रॅलीचे आयोजन
SHARES

मुंबईत रविवारी (12 फेब्रुवारीला) विंटेज आणि क्लासिक कार रॅली २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.  या रॅलीमध्ये डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अनेक रंगीबेरंगी जुन्या गाड्या आणि बाईक पाहायला मिळतील. एकेकाळी अभिमानाची सवारी असलेल्या या विंटेज कार्सची शैली आजही अनोखी आहे.

वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA) आणि विंटेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (VCCCI) यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 40व्या वार्षिक व्हिंटेज कार फिएस्टा’ मध्ये 150 हून अधिक क्लासिक आणि विंटेज वाहनांचा समावेश असेल. वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पुन्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर असा रॅलीचा मार्ग आहे.

मुंबईत विंटेज आणि क्लासिक वाहनांचा उत्तम संग्रह आहे. त्यातच व्हीसीसीसीआय हा देशातील प्रमुख क्लबपैकी एक आहे.राजेशाही  कुटुंबातील अनेक गाड्या फिएस्टामध्ये सहभागी होत आहेत.  त्यामुळे कार फिएस्टाच्या वैशिष्ट्यांमध्ये    आणखी भर पडेल, असे व्हीसीसीसीआयचे अध्यक्ष नितीन डोसा म्हणाले.

राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार फिएस्टा आयोजित केला जात आहे . पर्यटन    संचालक त्याचे आयोजन करत आहेत.

यंदाच्या कार फिएस्टामध्ये दिग्गज अब्बास जसदनवाला यांच्या मालकीची 1903 हंबर ही सर्वात जुनी कार पाहायला  मिळेल. मुंबईसह नवी दिल्ली, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि चेन्नई येथील वाहनांचा फिएस्टामध्ये सहभाग असेल.

योहान पूनावाला, विवेक गोयंका, होर्मुझ कामा, निशांत डोसा, समीर कदम हे त्यांच्या दुर्मिळ गाड्यांच्या ताफ्यासह सहभागी होत आहेत. Rolls Royce’s, Bentleys Packards, ALVIS, Buicks, Austin, Hellman, इत्यादी दुर्मिळ दुचाकींसह दुर्मिळ कार पाहायची मेजवानी मुंबईकरांना मिळणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा