Advertisement

मुंबई-अलिबाग रो-रो सर्विस 25 ऑगस्टसाठी बंद

M2M ने दिली माहिती

मुंबई-अलिबाग रो-रो सर्विस 25 ऑगस्टसाठी बंद
SHARES

मुंबई ते अलिबाग जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई अलिबाग रो-रो सेवा 25 ऑगस्टसाठी बंद करण्यात आली आहे. M2Mच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 26 ऑगस्टला देखील रो-रो सुरू असेल की नाही याबाबत कुठलीच माहिती मिळू शकली नाही. 

सेवा बंद असण्यामागे नेमके काय कारण आहे याची अधिकृत माहिती रोरो चालवणाऱ्या कंपनीनी दिली नाही. M2M ने सांगितल्यानुसार, 25 ऑगस्टच्या सर्व नियोजित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबई लाईव्हशी बातचित केलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही सकाळी भाऊचा धक्क्याला रो-रो फेरीसाठी गेलो. तेव्हा पाहिले की, पोलिसांचा मोठा ताफा तिकडे उपस्थित होता. यासोबत पोर्ट ट्रस्टचे अधिकारी देखील तिकडे उपस्थित होते. बराच वेळ फेरी निघत नसल्याने प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पण फेरी जाणार नाही समजल्यावर आम्हाला रोडने जावे लागले. 

अखेर M2M ने आज 25 ऑगस्टसाठी सेवा बंद असणार असल्याचे वेबसाईटवर जाहीर केले. पण यामुळे रो रो ने प्रवास करणाऱ्यांना 25 ऑगस्टच्या दिवशी रोडने प्रवास करावा लागेल. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा