Advertisement

मुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट

मुंबई उपनगरात गुरुवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

मुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट
SHARES

मुंबई उपनगरात गुरुवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात १ हजार ३८४ रुग्णांचे निदान झाले असून, १२ मृत्यू झाले. तर दुसरीकडे ५ हजार ६८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण १० लाख ४ हजार ३८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्याही कमी झाली असून, सध्या १८ हजार ४० रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईत बुधवारी पॉझिटिव्हिटी दर ४.३ टक्के असल्याची नोंद होती. मात्र मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्ण निदान घटल्यानं उपचाराधीन रुग्णांचा आलेखही घसरला आहे. शहर उपनगरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानं आता तिसरी लाट ओसरत असल्याची दिलासादायक स्थिती आहे. शहर उपनगरात गुरुवारी ३.२ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे.

हे मुंबई शहर जवळजवळ पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण आहे, असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले. प्रशासनाने दिली आहे.

२० ते २६ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.३५ टक्के आहे. दिवसभरातील १ हजार रुग्णांपैकी १ हजार १६२ रुग्ण लक्षणविरहित आहेत, हे प्रमाण ८४ टक्के आहे. मुंबईत एकूण १० लाख ४१ हजार ७४७ कोरोनाबाधित असून, मृतांचा आकडा १६ हजार ५८१ आहे.

महापालिकेने रुग्णांचा शोध घेण्यासाठी २४ तासात ४२ हजार ५७० चाचण्या केल्या असून, आतापर्यंत एकूण १ कोटी ५१ लाख ३० हजार ८३१ कोरोना चाचण्या केल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र शून्यावर आले आहे.

तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २८ आहे. मागील चोवीस तासात रुग्णांच्या संपर्कातील ५ हजार ७६७ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा