Advertisement

भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

मुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात मोठा अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता
SHARES

मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेक जणांना धडक दिली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झालाय. बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे.

बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली. या बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 3 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या  अपघातात 10 पेक्षा अधिक लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मोठा गोंधळ झाला असून तणाव स्थिती निर्माण झाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला आहे.  20 जण जखमी झाल्याची पालिकेची माहिती आहे.  जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बाबा रुग्णालयातील माहितीनुसार, साधारण पंधरा गंभीर जखमींना आणण्यात आलं होतं. त्यातील काही जण मृत्यूमुखी पडले आहेत. काही रुग्णांना सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठा जमाव रस्त्यावर आला आहे. या जमावाला बाजूला करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. मात्र, जखमींमधील अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा