Advertisement

बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मागण्या मान्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थी आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर बेस्टच्या चालकांनी संप मागे घेतला.

बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मागण्या मान्य
SHARES

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा संप सुरू होता. या कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य होताच संप मागे घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक झाली या बैठीकत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे.  सर्व आगारातील कंत्राटी कर्मचारी एकत्र येत आझाद मैदानात याबाबत घोषणा केली आहे. 

बेस्ट कंत्राटी कामगारांच्या 'या' मागण्या मान्य 

  • कामगारांचे ( Basic Salary ) पगार 18,000 ( अठरा हजार ) करण्यात येणार
  •  कामगारांच्या वार्षिक रजा ( CL / SL / PL ) भरपगारी करण्यात येणार, प्रवास मोफत देणार 
  •  कामगारांना वार्षिक दिवाळी बोनस देण्यात यावा
  •  कामगारांना साप्ताहिक सुट्टी पगारी
  • कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी यावर कंपन्याना सूचना देणार
  •  गेल्या सात दिवसाचा पगार देणार

मुंबईला ज्याप्रकारे मुंबई लोकल तारते त्याप्रकारे येथे बेस्ट बस देखील उत्तम सेवा देताना दिसत असते. मात्र गेल्या आठ दिवसापासून बेस्ट मुंबईकरांवर ती नाराज होती. बेस्ट बस कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं होते. गेले आठ दिवस मुंबईकर हैराण होते. मात्र यावर तोडगा काढण्यास सरकार प्रशासनाला  यश आले आहे.



हेही वाचा

विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाला विलंब लागणार

मुंबई विमानतळावर पहिले ड्राइव्ह-थ्रू मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा