Advertisement

भारतीय बनावटीचे विमान आकाशात झेप घेण्याच्या तयारीत


भारतीय बनावटीचे विमान आकाशात झेप घेण्याच्या तयारीत
SHARES
  • अमोल यादव यांनी तयार केलेल्या भारतीय बनावटीचे विमान आता आकाशात झेप घेण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर 2017 पर्यंत हे विमान आकाशात झेप घेणार आहे.19 सीटर विमानाचा पहिला लूक मंगळवारी कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईत कांदिवली चारकोप येथे प्रसार माध्यमांसमोर आणला.


भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाचा प्रकल्प ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्याचा कॅप्टन अमोल यादव यांच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ही वाटचाल आहे. मूळचे साताऱ्याचे रहिवासी असलेले अमोल यांच्या तब्बल 17 वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. मुंबईत राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवरच त्यांचे हे प्रयोग सुरू होते. मुंबईतील ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्यांचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा जगासमोर आला.

अनेक देश, राज्य आणि कंपन्यांनी त्यांच्यासमोर विमाने बनवण्याचे प्रस्ताव ठेवले. आपल्या महाराष्ट्रातच कंपनी उभारायचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. कॅ. यादव यांनी अमेरिकेत वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. या प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या लहान आकाराच्या विमानामुळे राज्यातील 30 विमानतळांदरम्यान वाहतूक सुरू करता येईल. त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त पायाभूत सुविधांची गरज भासणार नाही, असे कॅप्टन अमोल यादव यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा