Advertisement

एका कुत्र्यानं रोखली मुंबईची 'लाइफलाइन'


एका कुत्र्यानं रोखली मुंबईची 'लाइफलाइन'
SHARES

घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला थांबवणं तशी कठीण बाब. पण मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन रखडली की मुंबई ठप्प झालीच म्हणून समजा. काही दिवसांपूर्वीच पडलेल्या मुसळधार पावसात मुंबईकरांनी याचा पुरेपुर अनुभव घेतला. पण मंगळवारी चक्क एका कुत्र्यानं मुंबईची ही लाइफलाइन काही वेळ रोखून धरल्यानं प्रवाशांचा जीव अक्षरश: भांड्यात पडला होता.

मंगळवारी दुपारी चर्चगेट स्थानकावर विरार-चर्चगेट फास्ट लोकल पोहोचणारच होती की इतक्यात एक कुत्रा थेट ट्रकवर जाऊन उभा राहिला. ही लोकल स्थानकात घेऊन येणाऱ्या मोटरमननं कुत्रा पाहताक्षणीच हॉर्न वाजवण्यास सुरूवात केली.

खरं तर लोकलच्या कर्णकर्कश हॉर्ननं हा कुत्रा तत्काळ घाबरून ट्रॅकवरून दूर व्हायला हवा होता. पण हा कुत्रा जरा जास्तच धीट निघाला. लोकलचा हॉर्न ऐकूनही तो जागीच उभा होता. अखेर त्याच्यापासून काही अंतरावरच मोटरमननं लोकल थांबवली. त्यानंतर मोटरमन आणि एका प्रवाशानं ट्रॅकवर उतरून या कुत्र्याला तेथून हटवलं. कुत्रा बाजूला झाल्यानंतर ही लोकल स्थानकात पूर्णपणे शिरली.

ते एक बरं झालं की या दिवशी अनंत चर्तुदर्शीची सुट्टी असल्यानं लोकलला फार गर्दी नव्हती. त्यामुळं रेल्वेच्या वेळापत्रकावर या घटनेचा कुठलाही परिणाम झाला नाही.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा