Advertisement

एनडीए, नेव्हल अकॅडमी लेखी परीक्षा (द्वितीय) 2017 चे निकाल जाहीर


एनडीए, नेव्हल अकॅडमी लेखी परीक्षा (द्वितीय) 2017 चे निकाल जाहीर
SHARES

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 10 सप्टेंबर, 2017 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संरक्षणप्रबोधिनी (एनडीए) 2 आणि नेव्हल अकॅडमी या लेखी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.  या परीक्षेनंतर सैन्य, नौदल आणि हवाईदलात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखात संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळ (एसएसबी) च्या वतीने घेतली जाईल. त्यानंतर या उमेदवारांना भारतीय नौदल अकादमी  (आयएनएसी) यामध्ये प्रवेश घेता येईल.  ही प्रवेश प्रक्रिया 2 जुलै, 2018 पासून सुरू होणार आहे.


या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना आता  joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यानंतर या उमेदवारांना एसएसबीच्या ट्रेनिंगसाठी तारीख दिली जाईल.  त्याचा मेलही त्या उमेदवारांना पाठवला जाईल.

http://pibphoto.nic.in/documents/rlink/2017/nov/p201711101.pdf

यासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांना  011-23385271 / 011-23381125 / 011-230 9 8543 या क्रमांकावर सकाळी10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत संपर्क करता येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा