Advertisement

वाहनांवर स्टिकर लावण्याचा आदेश अवघ्या ७ दिवसांत रद्द

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी वाहनांला एक खास स्टिकर लावण्याचं आवाहन केलं.

वाहनांवर स्टिकर लावण्याचा आदेश अवघ्या ७ दिवसांत रद्द
SHARES

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याचवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी वाहनांला एक खास स्टिकर लावण्याचं आवाहन केलं. यासाठी मुंबई पोलिसांनी खास ३ रंगाचे स्टिकर सिस्टम सुरु केली होती. मात्र, अवघ्या ७ दिवसातच ही कलरकोड स्टिकर सिस्टीम बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वाहनांवर कलरकोड स्टिकर लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर काही ठराविक रंगाचे स्टिकर लावणं बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ७ दिवसात मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळं आता मुंबईत कलरकोड स्टिकर लावणं बंधनकारक नाही, असे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कलर कोड पध्दत बंद

नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम पाहायला मिळत होता. कोणत्या रंगाचा स्टिकर  वाहनाला लावायचा याबाबत अनेकजण गोंधळले होते. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना याबाबत अनेक सवालही विचारण्यात आले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तयार केलेली ही पद्धत अवघ्या सात दिवसात त्यांच्यासाठी तापदायक बनली होती. त्यामुळे पोलिसांनी हा कलर कोडचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळं आता मुंबईतील वाहनांना लाल, पिवळा, हिरव्या रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

'राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी कलर कोड सुरु करत आहोत', अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली होती.

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कलर कोड दिला जाणार आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. वाहनांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महानगरपालिका, पत्रकार, डॉक्टर अशाप्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का? याचीही पडताळणी केली जाणार आहे.

वैद्यकीय कर्मचारी यांच्या वाहनांसाठी लाल रंग, भाजीपालाच्या वाहनासाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा