Advertisement

मुंबईत बुधवारी आढळले ६ हजार ३२ नवे कोरोना बाधित

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं आता मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावल्याचं दिसून येत आहे.

मुंबईत बुधवारी आढळले ६ हजार ३२ नवे कोरोना बाधित
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं आता मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावल्याचं दिसून येत आहे. मुंबईत बुधवारी ६ हजार ३२ नवे कोरोना बाधित आढळले आहेत.

मंगळवारच्या तुलनेत रुग्णसंख्या जवळपास १०० ने कमी झाली असून मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी नियमांचे पालन करणं मात्र महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी 6 हजार 32 नवे रुग्ण आढळले असून १२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळं कोरोनामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ४८८ झाली आहे.

नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट रुग्ण म्हणजेच १८ हजार २४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून ९५ टक्के इतका आहे.

सध्या मुंबईतील ५४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या ६ हजार ३२ रुग्णांपैकी ५३८ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ३८ हजार १०९ बेड्सपैकी केवळ ५ हजार ५८ बेड वापरात आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा