Advertisement

मुंबईतही लॉकडाऊन होण्याची शक्यता- पालकमंत्री अस्लम शेख

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद सादत ८ दिवसांचा वेळ दिला आहे.

मुंबईतही लॉकडाऊन होण्याची शक्यता- पालकमंत्री अस्लम शेख
SHARES

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद सादत ८ दिवसांचा वेळ दिला आहे. शिवाय, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. तसेच परिस्थिती बिघडली तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत.

फेब्रुवारीपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला असून, आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. घरातील एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

चाचण्यांच्या अहवालात कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर डिसेंबरनंतर घसरला होता. तो ०.१२ टक्क्यांवर स्थिर झाला होता. मात्र, हा दर वाढून आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर काळजीची बाब म्हणजे मुंबईतील काही विभागांमध्ये हा दर ०.३० टक्क्यांच्याही पुढे आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

'रुग्णसंख्या वाढत आहेत, हे मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. आता आम्ही कारवाईही सुरू केली आहे. लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेतली जाते. पण, प्रत्यक्षात ३०० ते ४०० लोकांना बोलवतात. अशा लोकांवर कारवाई सुरू केली आहे. नाईट क्लबवरही कारवाई सुरू केली आहे', असं पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं.

'सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही ज्या रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जातो, त्यांच्यावरही कारवाई सुरू केली आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील. सरकार म्हणून जे करणं शक्य आहे, ते आम्ही करतोय. पण, मुंबईकरांना परत लॉकडाउन बघायचा नसेल, तर त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे', असंही मुंबईतील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा