Advertisement

लोकलसेवा सुरू करा, अन्यथा महीना ३ हजार रूपये द्या, डबेवाल्यांची मागणी


लोकलसेवा सुरू करा, अन्यथा महीना ३ हजार रूपये द्या, डबेवाल्यांची मागणी
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं सर्वांच्या रोजगारवर गदा आली. त्याशिवाय, लोकल सेवा बंद असल्यानं मुंबईच्या डबेवालय पोहचवण्याचा व्यवसाय बंद करण्यात आला. मागील ५ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यानं मुंबईच्या डबेवाल्यावर आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं 'लोकल सेवा सुरू करा, अन्यथा डबेवाल्यांना महीना ३ हजार रूपये अनुदान द्या', अशी मागणी मुंबई डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

मागील ५ महिन्यांपासून लोकलसेवा सामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळं डबेवाल्यांची सेवा बंद आहे. अद्याप लोकल सेवा बंद असल्यानं रोजगार नाही, तसंच रोजगार नसल्यानं डबेवाल्यांची आर्थीक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.

मुंबई हळुहळु पूर्वपदावर येत आहे. सर्व कार्यालयही सुरू झाले असून चाकरमान्यांनी ही हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यामुळं चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोनकरून डबे पोहचविण्यास सांगत आहेत. परंतु,  लोकलसेवा बंद असल्यानं डबे पोहचवणे शक्य होत नाही.

मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा आत्यावश्यक सेवा मानुन त्यांना लोकलने प्रवासाची संधी द्यावी अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी केंद्र सरकारकडं केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा