Advertisement

धारावी पुन्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं नागरिकांना कोरोनाची बाधा होत होती. परंतु, यावेळीही धारावीकरांनी कोरोनाला हरवलं आहे.

धारावी पुन्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने
SHARES

मुंबईश राज्यभरात (maharashtra) गतवर्षी कोरोनानं शिरकाव केला. त्यावेळी मुंबईतील धारावी परिसर हा कोरोनाचा (coronavirus) हॉटस्पॉट ठरला होता. धारावीतील अनेकांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांनी सुखरूप मात केली होती. मात्र, कालांतरानं महापालिकेनं 'धारावी पॅटर्न' (dharavi) राबवत धारावीतील रुग्ण संख्या आटोक्यात आणली. शिवाय त्यानंतर धारावीकरांनी सुटकेचा निश्वास ही सोडला. मात्र विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं नागरिकांना कोरोनाची बाधा होत होती. परंतु, यावेळीही धारावीकरांनी कोरोनाला हरवलं आहे. कारण धारावी परिसरात अवघ्या एका नवीन रुग्णाची नोंद झाली आहे.

पहिल्या लाटेच्या सुरुवातीला धारावीत कोरोनाने थैमान घातलं होतं. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत दाटीवाटीची वस्ती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र नंतरच्या काळात महापालिकेने (bmc) केलेल्या काटेकोर उपाययोजनांमुळे पहिल्या लाटेत करोनाला थोपवण्यात धारावीला यश आलं. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही धारावीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा या परिसराने करोनाला रोखून दाखवलं आहे.

धारावीत सध्या कोरोनाचे एकूण १९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या लवकरच आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण या करोना संसर्ग साखळी तोडण्यात या परिसराला यश आलं आहे. वेगवान चाचण्या, कोरोनाविषयीक नियमावलीची कडक अंमलबजावणी आणि नागरिकांकडून मिळणार सकारात्मक प्रतिसाद या जोरावर धारावीनं कठीण वाटणारी गोष्टी साध्य करून दाखवली आहे.

धारावीसह संपूर्ण मुंबई शहरातच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र असं असलं तरीही मुंबईतील धोका पूर्णपणे टळलेला नाही. राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रियेसाठी ५ स्तर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई दुसऱ्या स्तरावर आहे. मुंबई जेव्हा पहिल्या स्तरावर जाईल तेव्हा शहरातील बहुतांश निर्बंध हटवण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

वसई-विरार पालिकेनं राबवली डोर टू डोर मोहीम

COVID-19 Second Wave: मे मध्ये ० ते १८ वयोगटातील फक्त ०.०७% मुलांना कोरोनाचा संसर्ग


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा