वसई-विरार (Vasai -Virar) शहर महानगरपालिकेनं (VVCMC) १ जून रोजी घरोघरी COVID 19 लसीकरण कार्यक्रम आयोजित केला होता. या उद्देशानं वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह ९ बस तैनात केल्या असल्याचं एजन्सीनं म्हटलं आहे.
प्रशासकिय वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत पाटील यांनी मिड-डेकडे यासंदर्भात पुष्टी केली आणि सांगितलं की, “वसई किल्ल्याजवळील लेपर कॉलनी, दत्ताधाम वसाहत इथं २० कुष्ठरोग्यांसाठी प्रथम लसीकरण करण्यात आलं होतं. कोविड -१९ ची लस आम्ही ४५ वर्षांवरील लोकांना दिली आहे.”
वसई-विरार परिवहन समितीचे अध्यक्ष प्रितेश पाटील म्हणाले की, लसीकरण मोहिमेसाठी (Vaccination Drive) ९ बसेस वापरण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी बसेस सुसज्ज आहेत.
पाटील म्हणाले, “प्रशासकिय बस रुग्णालयात असलेल्या बेड्ससह सुसज्ज आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर आणि परिचारिका यांचे पथक गरजूंना त्वरित वैद्यकीय मदत देऊ शकते,” पाटील म्हणाले.
“या व्यतिरिक्त, टीकामध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर देखील आहेत. यासोबतच आशा कर्मचारी तैनात केले आहेत.”
वसई विरारचे माजी नगराध्यक्ष प्रवीण शेट्टी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने काही आठवड्यांपूर्वी प्रशासकिय आयुक्तांकडे या योजनेचा प्रस्ताव पाठवला होता.
“वैद्यकीय कर्मचार्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस मोठ्या लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टी भागात दाखल होतील. लसीकरणासाठी प्रत्येक व्यक्तीमागे किमान ७ ते १० मिनिटं लागतात. प्रतिकूल प्रतिक्रियांची तपासणी करण्यासाठी लसीकरणानंतर प्रत्येक लाभार्थी ३० मिनिटांच्या निरीक्षणाखाली ठेवले जातात, ”शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा