Advertisement

दिलासादायक! मुंबईतील हे परिसर कोरोनामुक्तीच्या मार्गावर

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे.

दिलासादायक! मुंबईतील हे परिसर कोरोनामुक्तीच्या मार्गावर
SHARES

कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.१५ टक्क्यांवर आला आहे, तर काही महिन्यांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेले परळ (parel), चेंबूर (chembur), घाटकोपर हे विभाग आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. मुंबईत फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढला. 

विशेषतः चेंबूर विभागात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सर्वच विभागांमध्ये संसर्ग वाढत गेला. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या ९ ते १० हजारांपर्यंत पोहोचली. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ९२ हजारांवर पोहोचला होती. त्यामुळं पालिका प्रशासनानं चेस दि व्हायरस, मिशन झिरो, माझी जबाबदारी अशा अनेक मोहीम सुरू केल्या.

अशा अनेक प्रयत्नांचा प्रभाव आता दिसून येत आहे. अखेर कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला आहे. दररोजच्या बाधित रुग्णांची संख्यादेखील १ हजारांच्या आसपास आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४५३ दिवसांवर पोहोचला आहे. 

विभाग
सक्रीय रुग्ण
रुग्ण वाढीचा दैनंदिन दर
एफ दक्षिण परळ 
३९१
०.०९ टक्के
सी भुलेश्वर
११८
०.०९ टक्के
एन घाटकोपर
६८०
०.११ टक्के
एम पश्चिम चेंबूर पश्चिम 
५८९
०.११ टक्के

राज्यात बुधवारी कोरोनाचे (coronavirus) नवीन १५ हजार १६९ रुग्ण आढळले. तर २९ हजार २७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच २८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृत्यूंचा आकडा आकडा घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत (mumbai) ९२५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १६३२ रुग्ण बरे झाले आहेत. 

आतापर्यंत एकूण ९६ हजार ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के इतका झाला आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या ५७ लाख ७६ हजार १८४ झाली आहे. तर ५४ लाख ६० हजार ५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  राज्याचा रिकव्हरी रेट ९४.५४ टक्के  झाला आहे. 

महाराष्ट्रात (maharashtra) सध्या करोनाचे २ लाख १६ हजार १६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २७ हजार ९९० रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार ८६२, मुंबई महापालिका क्षेत्रात १८ हजार ४७८, ठाणे जिल्ह्यात १७ हजार ३४१ तर सातारा जिल्ह्यात १६ हजार ९७९ रुग्ण  उपचार घेत आहेत.



हेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

मीरा- भाईंदरमध्ये दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा