Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जवळपास ६८ टक्के फटका बसला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका
SHARES

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जवळपास ६८ टक्के फटका बसला आहे. विमानांची उड्डाणसंख्या रोडावल्याने प्रवासीसंख्येत घट झाली आहे.

मुंबईचे विमानतळ कोरोना संकटाआधी देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळ होते. विमानतळावरून दररोज ९०० हून अधिक विमानांची ये-जा सुरू होती. पण कोरोना संकटात दररोजची उड्डाणसंख्या रोडावली. डिसेंबर-जानेवारीदरम्यान करोनाची लाट ओसरल्याने उड्डाणसंख्या पुन्हा एकदा ६०० च्यावर गेली होती. पण लगेच मार्चपासून दुसरी लाट आल्यानं पुन्हा उड्डाणसंख्येत घट झाली. त्याचाच मोठा फटका विमानतळाला बसला आहे.

मुंबईच्या विमानतळाला सध्या दररोज केवळ ३०० प्रवासी विमान हाताळणीची परवानगी आहे. त्यातही मागणी नसल्याने सध्या दररोज जेमतेम १०० विमानांची ये-जा होत आहे. विमानतळावरून आधी दररोज १.४० लाख प्रवाशांची ये-जा होती. हा आकडा १७ हजार ६०० पर्यंत घसरला आहे. पण त्याचवेळी कार्गो हाताळणी मात्र कमी झालेली नाही. दररोज सरासरी ३८७ टन कार्गो हाताळणी होत आहे. दररोज २० शहरांसाठी कार्गो विमानांची ये-जा होत आहे.

मागील दोन महिने महाराष्ट्रातील (maharashtra)  कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती.  नव्या रुग्णांचा आकडा  ५० ते ६० हजारांवर गेला होता. मात्र, आता रुग्णसंख्या घटू लागली आहे.  मंगळवारी राज्यात १४ हजार १२३ नवीन रुग्ण आढळले. तर ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत (mumbai) मंगळवारी ८३१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ५८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत   १७३२८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५३ दिवसांवर गेला आहे. 



हेही वाचा

सलमान खानच्या नोटीसनंतर KRKनं ट्विटर अकाऊंट केलं प्रायव्हेट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा