Advertisement

सलमान खानच्या नोटीसनंतर KRKनं ट्विटर अकाऊंट केलं प्रायव्हेट

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तसेच ट्विट्ससाठी चर्चेत राहणारा अभिनेता तसेच स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल राशिद खान म्हणजे KRK सध्या चर्चेत आहे.

सलमान खानच्या नोटीसनंतर KRKनं ट्विटर अकाऊंट केलं प्रायव्हेट
SHARES

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तसेच ट्विट्ससाठी चर्चेत राहणारा अभिनेता तसेच स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल राशिद खान (Kamal R. Khan) म्हणजे KRK सध्या चर्चेत आहे.

सलमान खानवरील (Salman Khan) टीका त्याला महागात पडलेली दिसत आहे. सलमानच्या टीमनं काही दिवसांपूर्वी लिगल नोटीस त्याला पाठवली होती. तर आता KRKनं त्याचं ट्वीटर अकाउंट प्रायव्हेट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी KRKनं सलमानचा बहूचर्चित चित्रपट ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) वर समिक्षा करत चांगलीच टीका केली होती. त्यानंतर सलमानकडून KRKला नोटीस बजावण्यात आली.

तर ही नोटीस आपण केलेल्या समिक्षेमुळेच आली असल्याचं KRK नं ट्वीट करत सांगितलं. पण सलमानच्या वकिलांनी याचा खुलासा करत ही नोटीस वेगळ्या कारणासाठी असल्याचं म्हटलं.

‘गेले काही महिने कमाल खान सतत सलमान खान , सलमान खान फिल्म्स (SKF) तसंच सलमानचा ब्रँड बीइंग ह्युमन यांची बदनामी करत आहे. तसंच सलमानला गुंड म्हणून संबोधत आहे. पैसे दाबल्याचे खोटे आरोप करत आहे.’ यामुळे ही नोटीस पाठवली असल्याचा खुलासा त्यांनी केला.

या सगळ्या प्रकारानंतर KRKनं अनेक ट्विट्स केले होते. मात्र आपण सुनावणीनंतर उत्तर देणार असल्याचंही म्हटलं होतं. पण आता त्यानं त्याचं शस्त्र असलेलं ट्विटर अकाउंट लॉक केलं आहे. त्यामुळे आता केवळ KRK चे फॉलेवर्सच त्याचे ट्वीट पाहू शकणार आहे.

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सलमान खानचा 'राधेः तुम्हारा मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चाहत्यांना आणि समीक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. काहींनी त्याचे कौतुक केलं तर काहिंनी चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली.

रिपोर्ट्सनुसार, सलमान खाननं मानहानीची नोटीस पाठविली आहे. केआरकेनं ट्विटरवर याची माहिती दिली. "प्रिय सलमान खान तुम्ही पाठवलेली नोटीस म्हणजे तुम्ही निराश असल्याचा पुरावा आहे. मी माझ्या अनुयायांचा आढावा घेत आहे आणि माझं काम करत आहे. मला थांबवण्याऐवजी तुम्ही चांगले चित्रपट बनवावेत," असं मत देखील व्यक्त केलं.



हेही वाचा

बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांच्या मदतीस धावला सलमान खान

'राधे'च्या कमाईतील एक भाग कोरोनाविरूद्ध लढ्यास समर्पित, सलमान खानचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा