Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

'राधे'च्या कमाईतील एक भाग कोरोनाविरूद्ध लढ्यास समर्पित, सलमान खानचा निर्णय

अभिनेता सलमान खाननं झी एंटरटेन्मेंटसोबत मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

'राधे'च्या कमाईतील एक भाग कोरोनाविरूद्ध लढ्यास समर्पित, सलमान खानचा निर्णय
SHARES

अभिनेता सलमान खाननं झी एंटरटेन्मेंटसोबत मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटाच्या कमाईतील एक भाग ते कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी देतील. यासाठी त्यांनी गिव्ह इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत, आवश्यक वैद्यकीय उपकरणे म्हणजेच ऑक्सिजन सिलिंडर्स, कन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स दान केले जातील.

सलमानची मुख्य भूमिका असलेला राधे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी ईदच्या दिवशी थिएटरसह डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “देशातील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे आणि एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून आम्ही कोविड -19 विरूद्धचा लढा आणखीन मजबूत करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्यास तयार आहोत.

आम्ही केवळ आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजनच करत नाहीत तर देशभर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राधे या चित्रपटाच्या प्रदर्शनातून येणारे उत्पन्नातील एक मोठा भाग महामारीनं पीडित लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.”

झी स्टुडिओनं २४० हून अधिक रुग्णवाहिका, ४६ हजार पीपीई किट्स, ऑक्सिजन ह्युमिडीफायर्स दान केले आहेत. त्याचबरोबर, कंपनीनं महाराष्ट्रातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ३०४ बेडचे कोविड हेल्थकेअर सेंटर (डीसीएचसी) तयार करून ते दान केले.हेही वाचा

'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर गोंधळ, शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न

हर्षवर्धन राणे बुलेट विकून गरजूंसाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर करणार खरेदी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा