Advertisement

हर्षवर्धन राणे बुलेट विकून गरजूंसाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर करणार खरेदी

हर्षवर्धननं सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून स्वतःची बाईक विकणार असल्याचं सांगितलं आहे.

हर्षवर्धन राणे बुलेट विकून गरजूंसाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर करणार खरेदी
SHARES

अनेक कलाकार कोरोना रुग्णांना आपल्या परीनं जमेल ती मदत करत आहेत. आता यात अभिनेता हर्षवर्धन राणेच्या नावाचाही समावेश झाला आहे. हर्षवर्धननं सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून स्वतःची बाईक विकणार असल्याचं सांगितलं आहे. या पैशातून तो गरजूंसाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर खरेदी करणार आहे.

हर्षवर्धननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या बाईकचे फोटो त्यानं शेअर केले आहेत. हर्षवर्धनची ही आवडती बाईक आहे. 'कृपया कोणी तरी माझी ही बाईक विकत घ्या… त्यातून मिळणाऱ्या पैशांतून मी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर विकत घेईल आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदत करेन. हैदराबादमध्ये मला चांगल्या गुणवत्तेचे ऑक्सिजन कंसन्ट्रेटर शोधण्यास मदत करा….”, अशा आशयाचे कॅप्शन हर्षवर्धनने ते फोटो शेअर करत दिले आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये हर्षवर्धनला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याला आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तो चार दिवस ऑक्सिजन सपोर्टवर होता. हर्षवर्धन ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आला आहे. लवकरच तो जॉन अब्राहम स्टारर ‘तारा बनाम बिलाल’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हर्षवर्धन राणेपूर्वी बॉलिवूडमधील अनेक कलाकार गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कन्नड अभिनेता अर्जुन गौडा सध्या रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतोय. तो रुग्णांना हॉस्पिटपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय.

याशिवाय कोरोना मृत झालेल्या लोकांवर तो अंत्य संस्कारदेखील करतोय. याशिवाय सोनू सूद, अक्षय कुमार ट्विंकल खन्ना, भूमी पेडणेकर, गुरमीत चौधरी हे कलाकारदेखील लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत.




हेही वाचा

'फोटो प्रेम'चा ट्रेलर प्रदर्शित, या दिवशी पाहा वर्ल्ड वाईड प्रीमिअर

अभिनेता रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा