Advertisement

अभिनेता रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अभिनेता रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण
SHARES

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ७४ वर्षीय रणधीर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोकिलाबेन मधील डॉक्टर संतोष शेट्टी यांनी PTIला माहिती दिली की, "त्यांना कोविड -१९ उपचारासाठी काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते स्थिर आहेत, काळजी करण्याची काहीच गरज नाही."

शोमॅन म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज कपूर यांच्या पाच मुलांपैकी तीन मुलांचे गेल्या १६ महिन्यांत निधन झाले आहे. राज कपूर यांना रणधीर, ऋषी आणि राजीव ही तीन मुले आणि रितू आणि रिमा या दोन मुली होत्या. आता तीन भावांपैकी रणधीर कपूर आणि बहिणींमध्ये रिमा जैन हयात आहेत.

ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल २०२० रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. ऋषी कपूर दोन वर्षे कर्करोगाशी लढा देत होते. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती. तर सर्वात धाकटे भाऊ राजीव यांचं यावर्षी ९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. बहीण रितू नंदा यांचं १४ जानेवारी २०२० रोजी दिल्लीत निधन झालं होतं. त्यांना कॅन्सर झाला होता.



हेही वाचा

कोरोना रुग्णांसाठी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानं केली 'ही' मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा