Advertisement

प्रियंका आणि निकनं भारतासाठी जमवला अडीच कोटींचा निधी

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं अलीकडेच देशाला कोरोनाच्या महामारीत मदतीसाठी ‘फंडरेजर’ची सुरुवात केली आहे.

प्रियंका आणि निकनं भारतासाठी जमवला अडीच कोटींचा निधी
SHARES

कोरोना महासाथीनं (Corona Pandemic in India) सध्या संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक कलाकारसुद्धा एकजूट झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि पती निक जोनस (Nick Jonas) सुद्धा यासाठी पुढे आले आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं अलीकडेच देशाला कोरोनाच्या महामारीत मदतीसाठी ‘फंडरेजर’ची सुरुवात केली आहे. आणि प्रियांकानं एक व्हिडीओ पोस्ट करत जगभरातून देशासाठी मदत मागितली आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे प्रियांका आणि निकने फंडरेजरमधून अवघ्या २४ तासात २ कोटी ८४ लाख रुपये जमा केले आहेत. याची माहिती स्वतः प्रियांकानं दिली आहे.


प्रियांका चोप्रानं आपल्या सोशल मीडियावरून त्या लोकांचे आभार मानले आहेत. ज्यांनी भारताच्या मदतीसाठी आपला हात पुढे केला आहे. व्हिडीओ शेअर करत प्रियांकानं कॅप्शन दिलं आहे, ‘टुगेदर फॉर इंडिया’. आपल्या सर्वांच्या मदतीसाठी, निधीसाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांचं सहकार्य कोरोना काळात भारतमध्ये नवीन बदल घडवून आणण्यास मदत करणार आहे. अजूनसुद्धा बरचं काही करायचं आहे. मला विश्वास आहे, की ज्या वेगानं हे काम सुरू झालं पुढं सुद्धा असचं चालू राहिलं. कृपया डोनेट करा’. अशा आशयाची पोस्ट प्रियांकाने लिहिली आहे.हेही वाचा

अभिनेता रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

कोरोना रुग्णांसाठी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानं केली 'ही' मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा