Advertisement

'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर गोंधळ, शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न

कलर्स वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या सांगितिक कार्यक्रमाचं चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथील रविंद्र भवनमध्ये सुरू आहे.

'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर गोंधळ, शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न
SHARES

महाराष्ट्रात ब्रेक दे चेन अंतर्गत सर्व प्रकाराच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हिंदी आणि मराठी वाहिन्यांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरू केलं आहे. अनेक मराठी मालिकांचं गोव्यात चित्रीकरण सुरू आहे.

कलर्स वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या सांगितिक कार्यक्रमाचं चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथील रविंद्र भवनमध्ये सुरू आहे. मात्र या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान गोंधळ उडालेला बघायला मिळाला. या वादामध्ये गायक अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केली.

‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू असताना गोव्यातील फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी चित्रीकरणाला विरोध दर्शवला आहे. चित्रीकरण सुरू असतानाच सरदेसाई आले आणि त्यांनी चित्रीकरणाला विरोध दर्शवला.

चित्रीकरणामुळे त्या भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंगचे पालन केलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ आमदार सरदेसाई यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. तसंच सर्व नियमांचं पालन करून चित्रीकरण सुरू असल्याचा दावा निर्मात्यांनी केला.



हेही वाचा

डॉक्टरांना राक्षस बोलणं भोवलं, कॉमेडियन सुनील पाल विरोधात तक्रार दाखल

यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं इंडस्ट्रीतील ३० हजार कर्मचाऱ्यांचं लसीकरण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा