Advertisement

यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं इंडस्ट्रीतील ३० हजार कर्मचाऱ्यांचं लसीकरण

लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्व खर्च यश चोप्रा फाउंडेशन करणार आहे.

यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं इंडस्ट्रीतील ३० हजार कर्मचाऱ्यांचं लसीकरण
SHARES

यशराज फिल्मसच्या यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. इंडस्ट्रीतील एकूण ३० हजार लोकाचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सनं घेतला आहे. एवढेच नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमासाठी लागणारे लसींचे डोस उपलब्ध करून देण्याचे आवाहन केलं आहे.

‘द यश चोपड़ा फाउंडेशन’च्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये इंडस्ट्रीमधील ३० हजार कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. 

तसंच ज्या ३० हजार कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीनं मोफत लस देण्यात येणार आहे. त्यांच्या लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्व खर्च यश चोप्रा फाउंडेशन करणार असल्याचं देखील या पत्रात लिहिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यशराज फिल्मच्या वतीनं लिहिण्यात आलेल्या या पत्राव्यतिरिक्त फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज ‌(FWICE) नं देखील या आशयाचं पत्र लिहलं आहे. लवकरात लवकर इंडस्ट्रीमधील कर्मचाऱ्यांसाठी लस उपलब्ध करुन देण्याचे आणि एक वेगळे लसीकरण केंद्र देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

तर फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेडरेशन आणि यशराज फिल्म्सच्या मागणी लवकरात लवकर मान्य करतील, आम्हाला आशा आहे. जेणेकरुन लसीकरणाचे हे अभियान लवकराच लवकर सुरू होण्यास मदत होईल. आमचे सगळे कर्मचारी कोरोना संकटासोबतच भूकेच्या संकटाशीही लढा देत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर लसीकरण अभियान सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे.

फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की, यशराज फिल्म्सच्या वतीनं आमच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना केवळ एकच नाहीतर दोन लसीचे डोस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


हेही वाचा 

'ही' अभिनेत्री चित्र विकून कोरोना रुग्णांसाठी जमवतेय निधी

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा