Advertisement

'ही' अभिनेत्री चित्र विकून कोरोना रुग्णांसाठी जमवतेय निधी

दलजीतनं स्वत: तयार केलेली काही चित्र विकून हा निधी उभा करण्याचं ठरवलं आहे.

'ही' अभिनेत्री चित्र विकून कोरोना रुग्णांसाठी जमवतेय निधी
SHARES

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अनेक कलाकारांनी मदतीचा हात दिला. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood), अक्षय कुमार, सलमान खान असे बरेच कलाकार मागील वर्षभरापासून गरजूंना मदत करत आहेत. यात आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरचा (Daljit Kaur) ही समावेश झाला आहे.

दलजीतनं स्वत: तयार केलेली काही चित्र विकून हा निधी उभा करण्याचं ठरवलं आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन सुंदर चित्रं पोस्ट केली, जी तिनं काढली आहेत. 


तिनं असंही लिहिलं आहे की, “जर माझ्याकडे अजून चित्रं असती, तर अजून मोठी मदत होऊ शकली असती. मला माहित नाही सध्या काय करणं योग्य आहे. आज हजारो लोक आयुष्याशी लढा देत आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. अशावेळी मला वाटतें की माझ्या या चित्रांचा लिलाव करून, ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी मी थोडीफार आर्थिक मदत नक्कीच उभी करू शकते.”

पुढे दलजीत म्हणते, “ही चित्रं मी अत्यंत प्रेमानं काढलेली आहेत. माझ्या घरीच कित्येक काळापासून आहेत. पण आता त्यांचा योग्य वापर करण्याची वेळ आली आहे...जास्तीत जास्त किंमतीमध्ये ही चित्रं विकून त्यातून मिळणारे पैसे दान करण्याचा माझा हेतू आहे.”

दलजीतच्या या अनोख्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत होत आहे. तिच्या हजारो चाहत्यांनी तिला याविषयी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर काही सेलिब्रिटींनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील नच बलिए (Nach Baliye), बिग बॉस (Big boss 13) या प्रसिद्ध कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेली दलजीत नेहमीच काहीना काही कारणानं चर्चेत असते. आता तिने कोरोनाग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे ती चर्चेत आली आहे.



हेही वाचा

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड

...तर नवी दयाबेव शोधू, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' निर्मात्याचा खुलासा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा