टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (tarak mehta ka ultah chashma) गेल्या १३ वर्षांपासून भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एक महत्वाचं पात्र म्हणजे जेठालालची पत्नी दयाबेन. दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकानी (Disha Vakani)गेल्या तीन वर्षांपासून मालिकेत दिसत नाही आहेत.
नुकतंच दयाबेनची मालिकेत पुन्हा कधी एंट्री होणार याबाबत निर्माते असित मोदी (Asit Modi)यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की दिशा वाकानी यांना जर ही मालिका सोडायची असेल, तर मालिका नव्या अभिनेत्रीसह (New Actress) पुढे जाईल.
ते म्हणाले,की सध्या मालिकेत दयाबेनचं परतणं आणि पोपटलालच्या लग्नापेक्षा बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. या महामारीत इतर अनेक चांगले विषय आम्ही या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. तसंच कलाकारांना अडचणी भासू नयेत, यासाठी कलाकारांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन शूटिंग कसं करता येईल, याबद्दल आम्ही विचार करतोय. यासाठी बायो बबल फॉरमॅट(Bio Bubble Format)(म्हणजेच जैव सुरक्षित वातावरण) चांगला पर्याय आहे, यासाठी परवानगी मिळाल्यास आम्ही त्यानुसार काम करू.
दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी २०१७ मध्ये मॅटर्निटी लिव्ह म्हणजेच प्रसूती रजेवर (Maternity leave)गेली होती. त्यानंतर ती केवळ एकाच एपिसोडमध्ये पुन्हा दिसली. त्यामुळे दिशा पुन्हा मालिकेत परतणार की नाही, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा